क्रीडा क्षेत्रात यंदा सहा पद्म पुरस्कार


भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ठ योगदान दिलेल्या व्यक्तींना दरवर्षी पद्म पुरस्कारांनी गौरविले जाते. यंदा क्रीडा क्षेत्रातील ६ गुणवान खेळाडूंनी मानाचे हे नागरी पुरस्कार मिळविले आहेत. पद्मभूषण हा तीन नंबरचा तर पद्मश्री हा चार नंबरचा नागरी पुरस्कार मनाला जातो.

यंदा क्रिकेट मधील योगदानाबद्दल टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याला पद्मभूषण पुरस्काराने गौरविले गेले आहे. त्याने दोन वेळा भारतीय टीमला विश्व विजेते करण्याची कामगिरी बजावली आहे. स्नूकर खेळाडू पंकज आडवाणी यालाही पद्मभूषण दिली गेली आहे. त्याने १८ वेळा विश्व चँपियन बनण्याचा पराक्रम यंदा केला आहे.

२२ वर्षांनतर भारताला वेटलिफ्टिंग मह्द्ये सुवर्णपदक जिंकून देणारी मीराबाई चानू, २०१७ मध्ये चार सुपरसिरीज खिताब जिंकणारा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत, भारताचा उभारता टेनिसस्तर सोमदेव बर्मन यांना पद्मश्री मिळाली आहे. त्याचबरोबर मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री दिली गेली आहे. पेटकर हे माजी सैनिक आहेत. १९६५ च्या युद्धात गोळ्या लागून जखमी झाल्यानंतर त्यांना सेनेतून निवृत्त केले गेले होते त्यानंतर त्यांनी जलतरण, टेबल टेनिस, थाळीफेक या खेळात प्राविण्य मिळवून भारतला पॅराऑलिम्पिक मध्ये पहिले गोल्ड मिळवून दिले आहे.