३०० भाग्यवंताना मिळणार इंडियनची रोडमास्टर इलाईट बाईक


लग्झरी बाईक ब्रांड मधील प्रमुख नाव असलेली इंडियन मोटरसायकल्सने त्यांची क्रुझ बाईक बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही बाईक आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम जुलै २०१७ मध्ये शोकेस केली गेली होती ती आता लवकरच बाजारात आणली जात आहे. ही लिमिटेड एडिशन बाईक आहे व तिची केवळ ३०० युनिट बनविली जाणार आहेत. भारतात या बाईकची किंमत साधारण ४० लाख रुपये असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

या बाईकला युनिक लुक दिला गेला आहे. काळा, निळा पेंट स्कीमच्या या बाईकमध्ये क्रोम चा भरपूर वापर केला आहे तसेच ड्युअल टँक, लोअर्सवर २३ कॅरेट गोल्ड लीफ बेजिंग आहे. बाईकला राईट कमांड सिस्टीम, पॅसेंजर आर्मरेस्ट, ड्रायव्हर फ्लोअरबोर्ड, प्रीमियम टुरिंग कॅनसोल अशी फीचर्स आहेत. १८११ सीसीचे थंडरस्ट्रोक व्ही ट्वीन इंजिन, ६ स्पीड गिअरबॉक्स, नेव्हिगेशन, एबीएस सिस्टीम सह आहे. भारतात ही बाईक कम्प्लीटली बिल्ट युनिट म्हणूनच येणार आहे.

Leave a Comment