जमिनीपासून ४०० फुट उंचावर पार पडला विवाह


आजकाल अनेकजण आपला विवाह यादगार व्हावा यासाठी अनेक पद्धती वापरतात. कुणी विमानात, कुणी समुद्रात, कुणी बलून मध्ये विवाह करतात. अनेकजण डेस्टिनेशन विवाह करतात. अमेरिकेतील एका प्रेमी युगलाने त्यांच्या विवाहासाठी असे डेस्टिनेशन निवडले की सर्वसामान्य वऱ्हाडी तेथे जाण्यास धजावणार नाहीत. कॅलिफोर्नियात रायन जेनेक्स य किमबर्ले यांनी जमिनीपासून ४०० फुटांवर दोन पहाडांमध्ये बांधलेल्या जाळ्यात विवाह केला. अब्बी हर्न या फोटोग्राफर ला फोटो काढण्यासाठी ड्रोन चा वापर करावा लागला.

रायन व किम याची पहिली भेट उटाह च्या मोआब शहरात झाली होती. येथे दरवर्षी हाय लायनिंग म्हणजे उंचावर बांधलेल्या जाळ्यावर तोल सावरत चालण्याचा महोत्सव भरतो. हे दोघे या महोत्सवात पार्टीसीपंट म्हणून भेटले व तेथेच त्यांचे सुत जमले. दोघेही एकाच पेशात असल्याने त्यांनी लग्न अश्या अनोख्या जागी करण्याचे ठरविले. या लग्नात त्याच्या १० बेस जंपर मित्रांनी उचावरून जमिनीवर झेप घेतला जोडप्यावर फुले उधळली असेही समजते.

Leave a Comment