येथे अंगावर फेकले जातात विषारी साप


भारत देश हा अनेक कारणांनी अनोखा आहे. येथील विविध रीतीरिवाज जगाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरतात. भारतात देव म्हणून माणसापासून ते पशु पक्षांपर्यंत अनेक गोष्टी पुजल्या जातात. नागपंचमी हा असाच एक मोठा उत्सव आहे. बिहार मधील बेगुसराय जवर समस्तीपुर मध्ये हा उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा होतो. येथे लोक विषारी नाग पकडतात व ते एकमेकांच्या अंगावर फेकले जातात. यात सर्वात विषारी नाग ज्याचा असेल तो विजेता मनाला जातो. येथील लोकांसाठी विषारी साप नाग जणू खेळणीच असतात.

या गावात नागाला देवता मानून पूजन केले जाते. गंडक नदीत लिक डुबकी मारून नाग हातात घेऊनच बाहेर येतात. त्यानंतर नागांची मिरवणूक काढली जाते. या जीवघेण्या खेळत अनेकदा सर्पदंश झाल्याने मृत्यू ओढवतात मात्र तरीही ही प्रथा पाळली जाते. भारतात २३६ विविध जातीचे साप आढळतात त्यातील काही जहाल विषारी आहेत. येथे आजही विषारी नाग साप चावला तर तंत्र मंत्रावर लोकांचा अधिक विश्वास आहे व यामुळे मृत्यू घडण्याचे प्रमाण अधिक आहे.

Leave a Comment