नवी दिल्ली – स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये भारतात ३ टक्क्यांनी घट झाली असून २०१७ च्या चौथ्या तिमाहीत ही घट झाली आहे. कमी किमतीचे ४जी फोन्स या मागील मुख्य कारण असल्याचे एका जर्मन रिसर्च फर्मने अहवालात म्हटले आहे.
४-जी फिचर्सफोनमुळे स्मार्टफोनच्या विक्रीत ३ टक्के घट
उदयोन्मुख आशियामध्ये २०१७ च्या चौथ्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्री ५८.६ दशलक्ष झाली. हा आकडा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या टक्क्यात घट झाल्याचे दर्शविते, असे संस्थेने म्हटले आहे. बाजारात कमी किमतीचे ४ जी फिचर्स फोन्सही लाँच करण्यात आल्याने स्मार्टफोनच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे या संस्थेने अहवालात म्हटले आहे. फोर-जी फिचर्सचा फोन कमी किमतीत मिळत असल्यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये ३ टक्क्यांनी घट झाली आहे. पण स्मार्टफोन्सच्या विक्रीत २०१८ मध्ये वाढ होणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. २०१७ च्या तुलनेत स्मार्टफोनचा खप तीन टक्क्याने वाढणार असल्याचे भाकित या संस्थेने केले आहे.