येत आहे ५ कॅमेरेवाला नोकिया स्मार्टफोन


फेब्रुवारीत होत असलेल्या मोबाईल वल्ड कॉंग्रेस २०१८ मध्ये एका पेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर होणार आहेतच पण अशी खबर आहे की नोकिया एचएमडी ग्लोबल चक्क ५ कॅमेरेवाला स्मार्टफोन सादर करत आहे. या प्रकारचा हा पहिलाच फोन ठरेल. यापूर्वी कंपनीने नोकिया ८०८ प्युअर व्ह्यू विंडोजवर आधारित लुमिया १०२० बाजारात आणला होता. या फोन ने एकाच खळबळ माजविली होती कारण या दोन्ही फोन साठी ४१ एमपी चे कॅमेरे दिले गेले होते.

नोकियाचा ५ कॅमेरेवाला फोन या वर्षअखेर बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. हा सर्वात नवा प्रयोग ठरेल कारण यापूर्वी ३ व चार कॅमेरेवाले फोन आले आहेत. नोकियाच्या नव्या फोन चा कॅमेरा गोलाकार असून त्याचे ७ भाग असतील. त्यातील पाच लेन्स कॅमेरे व बाकी दोन फ्लॅश असतील. यामुळे कमी उजेडात व विपरीत वातावरणात उत्तम फोटो काढता येणार आहेत. याच वेळी नोकिया ९ सादर केला जाईल असाही अंदाज आहे. या फोनला ड्युअल सेल्फी कॅमेरा, अतिशय पातळ बेजल,५.५ इंची ओलेड डिस्प्ले, १२ व १३ एमपी चे कॅमेरे असतील असे समजते.

Leave a Comment