केवळ आंघोळीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते ही महिला


सध्या सोशल मीडियात पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश अब्जाधिश मोहम्मद जहूर यांची पत्नी कमालिया या चर्चेचा विषय बनल्या आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. शॅम्पेनने आंघोळ करण्‍याचा छंद कमालिया यांना असून आपल्या छंदावर कमालिया कोट्यवधी रुपये खर्च करतात. आकर्षक दिसण्यासाठी केवळ आंघोळीवर वर्षाकाठी कमालिया कोट्यवधी रुपये खर्च करतात.

आंघोळीसाठी कमालिया पाण्यासारखा पैसा खर्च करतात. दररोज आंघोळीसाठी ५००० रुपये किमतीच्या १८ ते २० शॅम्पेनच्या बाटल्या कमालिया यांना लागतात. कमालिया यांच्या सेवेत दिवस-रात्र २२ नोकर असतात. नोकरांच्या पगारावर कमालिया यांचे पती वर्षाला १.९४ कोटी रुपये खर्च करतात.

कमालिया यांचे विवाहपूर्वी नाव नताल्या शमरेनकोवा असे होते. त्या मॉडेलिंग करत होत्या. यूक्रेनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा सर्वाधिक काळ रशियात गेला. सध्या पाकिस्तानात त्या चॅरिटी प्रोग्राममध्ये काम करतात.

रत्नजडीत घड्याळ कमालिया वापरतात. ४० लाख रुपयांहून जास्त त्यांच्या एका घड्याळची किंमत असते. त्यांच्या एका गॉगलची किंमत ४ लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्या वापरत असलेल्या हँडबॅगची किंमत ९० लाख रुपयांच्या घरात आहे. त्या बुट आणि चप्पलवर वर्षभरात २० लाख रुपयांहून जास्त खर्च करतात.

पॅरिसमधील सर्वात मोठे हॉटेल सूट इंपेरियल रिट्जमध्ये कमालिया यांना थांबायला आवडते. या हॉटेलमध्ये एका रात्र राहायचे भाडे जवळपास २० लाख रुपये आहे. कमालिया यांच्याकडे विदेशात टूर करण्यासाठी दोन प्रायव्हेट देखील जेट आहेत.

Leave a Comment