रुपया भवती दुनिया फिरते


आता देशातील सर्व जनतेला आगामी अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. कुणाला सवलती मिळणार, कुणासाठी फायदा, कुणासाठी तोटा याच्या चर्चा सुरु होतील. नागरिक कुठल्याही देशाचा असो त्याच्यासाठी देशाचे चलन फार महत्वाचे असते. या पैश्याबद्दल आपल्याला थोडी मजेशीर माहिती येथे देत आहोत.


भारतात सर्वाधिक बनावट नोटा १ हजार रुपयाच्या छापल्या गेल्या होत्या असे आकडेवारी सांगते. काही काळापूर्वी ५ रु. नाणी स्मगल केली जात कारण त्यापासून रेझर ब्लेड बनत. आपले १० रु. चे नाणे तयार करण्यासाठी येणारा खर्च आहे ६ रुपये १० पैसे. भारतात १९५४ ते १९७८ या काळात ५ व दहा हजाराच्या नोटा वापरल्या जात होत्या.


एका एनजीओ ने भ्रष्टाचार विरोधी मोहिमेसाठी शून्य रु.ची नोट छापली होती. फाटलेल्या नोटेचा अर्धा भाग सुस्थित असला तरी अशी नोट बँकेतून बदलून घेता येते. आपली नाणी नॉईडा, हैदराबाद, मुंबई, कोलकाता येथे पाडली जातात. जगातील सर्वात पहिली कागदी नोट चीन मध्ये १४०० वर्षापूर्वी तयार झाली होती. कागदी नोटांमुळे फ्लूचा प्रसार वेगाने होतो असे सांगतात. नोटेचा नंबर म्हणजे केवळ आकडे नसतात तर तो अल्फान्यूमेरिक कोड असतो.

काही देशात समुद्री शिंपले चलन म्हणून वापरले जातात. बिल गेट्स यांनी रोज ७ कोटी रुपये खर्च केले तरी त्यांची संपत्ती संपायला २१८ वर्षे लागतील असे अनुमान आहे. अॅपल कंपनी दर दोन मिनिटाला २ कोटी रुपयाची कमाई करते असे म्हणतात. अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा जास्त क्रेडीट कार्ड आहेत.

Leave a Comment