
नवी दिल्ली : ‘गो एअर’ या विमान कंपनीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त अवघ्या ७२६ रुपयांत विमानप्रवास करता येणार आहे. ही नवी ऑफर ‘गो एअर’ने आपल्या प्रवाशांसाठी आणली आहे.
आता गो एअर घडवणार अवघ्या ७२६ रुपयांत देशांतर्गत करा विमानप्रवास !
पाच दिवसांसाठी ‘गो एअर’ची ही ऑफर मर्यादित असणार आहे. २४ जानेवारीपासून ते २८ जानेवारीपर्यंत ही ऑफर असणार आहे. या ऑफरमध्ये १ मार्च ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्तात तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर ‘गो एअर’च्या वेबसाईटवरून तिकीट बुक केले तर यासाठी २५०० रुपयांचे व्हाऊचर्स मिळणार आहे.
