२५ लाखांची नोकरी सोडून करतो आहे मुलींचा नट्टापट्टा


जर्सी येथे वास्तव्यास असलेला ३९ वर्षीय जॉन श्रोट २५ लाखाचे पॅकेज असलेली नोकरी सोडून सध्या मुलींना नेल पोलिश करण्याचे काम करतो आहे. तो सध्या मुलींच्या सुंदर हातांना आणखी सुंदर बनवण्याचे काम करत आहे.

जॉनने एका डॉक्युमेंट्रीमध्ये आपल्या या अनोख्या जॉबविषयी सर्वांना सांगितले. जॉन यापूर्वी एका नामांकित कंपनीमध्ये स्प्रे पेंटरचे काम करत होता. तेथेच त्याची होणारी पत्नी ब्युटी पार्लर चालवत होती. जॉनने सांगितले की, ब्युटी पार्लरमध्ये माझ्या होणाऱ्या पत्नीला एवढी मजा येत असेल तर मग मी कार पेंटचे काम सोडून तिची या कामामध्ये मदत का करू नये? मी तेव्हाच एक नेल पोलिश करणारा व्हायचे असे ठरवले. विशेष म्हणजे नेल पोलिश करणे माझ्या मागील जॉबशी (कार पेंट करणे)फार मिळते-जुळते काम आहे. जुना पेंट काढून येथेही नवीन पेंट लावावा लागतो आणि या कामामध्ये मला मजा येत आहे.

जॉनने सांगितले की, पूर्वीच्या जॉबमधून तो वर्षाला ३०००० पाउंड (२५ लाख रु) कमवत होता परंतु त्याला जास्त समाधान मिळत नव्हते, जेवढे आता हे काम करून त्याला मिळत आहे. जॉनने २०१४ मध्ये कार केअरचे काम सोडून नेल पोलिश करण्याचे काम सुरु केले. त्याला येथे पैसे कमी मिळतात पण या कामात तो खूप आंनदी आहे.