लेनोवोचा कन्व्हर्टबल लॅपटॉप योगा ९२० लाँच


चीनी कंपनी लेनोवो ने त्याचा नवा कन्व्हर्टबल लॅपटॉप योगा ९२० लिमिटेड एडिशन भारतात मंगळवारी लाँच केला आहे. या लॅपटॉप ची किंमत १,२७,१५० रुपये आहे. कंपनीचे भारतातील वरिष्ठ अधिकारी राजेश थडानी यांनी दिलेल्या माहितीनुसार योग ब्रांडचा कन्व्हर्टबल श्रेणीतील वेगाने मागणी वाढत असलेला हा संगणक आहे. हे टू इन वन कन्व्हर्टबल डिव्हाइस दिगीतल पेन सह उपलब्ध केले गेले आहे.

या लॅपटॉपला व्होईस अॅक्टीव्हेटेड इंटेलिजन्स असिस्टंट कोर्ताना दिले गेले आहे त्यामुळे चार मीटर दूर अंतरावरूनही स्टँड बाय मोड मध्येही तो अॅक्टीव्ह करता येतो. त्याला टू एक्स थंडरव्होल्ट पोर्ट आहेत यामुळे डेटा वेगाने ट्रान्स्फर होतो. व्हीएचडी आयपीएस डिस्प्ले , थिन बॉर्डर, वाइड अँगल फोर के टचस्क्रीन डिस्प्ले, फिंगरप्रिंट रीडर, मेटल युनीबॉडी डिझाईन व विंडोज हॅलो ओएस अशी त्याची अन्य फिचर आहेत.

Leave a Comment