किडनी स्टोन्स न व्हावेत यासाठी…


अतिशय वेदना निर्माण करणारे किडनी स्टोन्स होण्याचे प्रमाण वाढताना दिसू लागले आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीचे आणि आपल्या आहारातील अॅसिडीक खाद्यपदार्थांचे हे परिणाम आहेत. किडनी स्टोन्स आपल्या शरीरातील युरीनरी सिस्टम मध्ये उद्भवतात. आपली युरिनरी सिस्टम आपल्या शरीरातील अनावश्यक, घातक पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करीत असते. पण बारीक खड्यांप्रमाणे दिसणारे क्रिस्टल्स, म्हणजेच किडनी स्टोन्स यामध्ये उद्भविल्याने युरिनरी सिस्टम आपले काम व्यवस्थित करू शकत नाही. कॅल्शियम, ऑक्सेलेट्स, आणि युरीक अॅसिड यांच्या कॉम्बिनेशन ने किडनी स्टोन्स बनतात. हे स्टोन्स न व्हावेत या करिता काहो गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. या मुळे लघवीचे प्रमाण आणि शरीरातील pH लेव्हल्स चांगल्या राहतात. तसेच लघवीची भावना झाल्यास, ती रोखून धरण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याने लघवी जास्त अॅसिडीक बनते. ज्या पेयांमध्ये अॅसिड्सचे प्रमाण जास्त असते, म्हणजेच सोडा युक्त कोल्ड ड्रिंक्स, मद्य, चहा आणि कॉफी सारख्या पेयांचे सेवन प्रमाणात करावे. यांच्यामधील ऑक्सेलेट्स किडनी स्टोन्स बनण्यास कारणीभूत ठरू शकतात.

आपल्या आहारामध्ये दही, पनीर, शेंगदाणे, पालक, बीट या पदार्थांचा समावेश करावा. जर तुम्ही बॉडी बिल्डींग सप्लिमेंट्स घेत असाल. तर याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतलेला असावा. या सप्लिमेंट मुळे किडनी वर प्रेशर पडू शकते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही सप्लिमेंट घेऊ नयेत. तसेच आपल्या आहारामध्ये सत्तू सारख्या पदार्थांचा समावेश करावा. हा पदार्थ किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. आपल्या आहारामध्ये नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, भाज्यांच्या रसाचा समावेश करा. हे रस, शरीरातील अॅसिड्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment