रेनॉच्या बेस्ट सेलिंग ‘क्विड’चे रिकॉल


नवी दिल्ली : भारतात आपल्या बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रेनॉ या कंपनीला रिकॉल करावे लागले आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

स्टीअरिंग सिस्टममध्ये असलेल्या बिघाडामुळे कार परत मागवण्यात आल्या आहेत. क्विड कार घेणा-या ग्राहकांना कंपनीकडून ऑफिशिअल पत्र पाठवले असून जवळच्या रेनॉ डिलरशी संपर्क करण्याचा आग्रह केला त्यांनी या ग्राहकांना आहे. डिलर्सकडून रेनॉ क्विड कार्चच्या स्टीअरिंग सिस्टीमची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

यापूर्वी देखील या कार एकदा परत मागवण्यात आल्या होत्या. याआधी ५० हजार क्विड कार्स रॅनोने परत मागवल्या होत्या. त्या कार्सव्या फ्युअल डिलिवरी सिस्टीममध्ये बिघाड होता. कार्स रिकॉल करणे ग्लोबल मार्केटमध्ये साधारण बाब आहे. आता हा ट्रेन्ड भारतीय बाजारातही वेगाने वाढत आहे. कंपनी ग्राहकांच्या हितासाठी कार्स परत मागवतात. क्विड रॅनोची आत्तापर्यंत सर्वात जास्त विकली गेलेली कार आहे.

Leave a Comment