२०२० पर्यंत १० लाख लघु-मध्यम व्यवसायिकांना ऑनलाइन प्रशिक्षण देणार फेसबुक


लंडन – युरोपियन युनियन (ईयू) मधील १० लाख लोकांना आणि व्यवसाय मालकांना २०२० पर्यंत फेसबुक प्रशिक्षण देईल. फ्रान्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संशोधन प्रकल्पाद्वारे१० दशलक्ष युरोची गुंतवणूक करेल असे फेसबुकने जाहीर केले आहे.

फेसबुक पुढील दोन वर्षात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, इटली आणि स्पेनमधील ३ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी फेसबुक डिजिटल ग्रोथ पार्टनर फ्रीफोर्समध्ये सहभागी होणार आहे. ७५ हजार लोकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल तर बाकीच्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पेन, पोलंड आणि इटलीमध्ये आम्ही तीन नवीन कौशल्य केंद्रे सुरु करणार आहोत. स्थानिक संघटनांच्या साहाय्याने ही केंद्रे चालवली जातील. डिजिटल कौशल्ये, माध्यम साक्षरता आणि ऑनलाइन सुरक्षा या विषयांवर या केंद्रात अल्पसंख्याक समाजाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती इएमइएचे उपाध्यक्ष किआरान क्यूल्टी यांनी दिली.

फेसबुक व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसाय मालकांना प्रशिक्षण देणार आहे. यात १ लाख लहान आणि मध्यम व्यवसायिकांना आणि अडीच लाख व्यवसायिकांना २०२० पर्यंत ऑनलाइन प्रशिक्षण देणार आहे. तसेच #SheMeansBusiness या कार्यक्रमातंर्गत फ्रान्समधील १५००० लोकांना प्रशिक्षण देणार आहे. फेसबुकने लहान आणि मध्यम व्यवसाय वाढवण्यासाठी २०११ पासून १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment