एअरटेलचा ३९९ रुपयांचा नवा प्लान नवा प्लान


मुंबई : एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान जाहीर केला असून एअरटेलने रिलायन्स जिओच्या ३९८ रुपयांच्या प्लानशी स्पर्धा करण्यासाठी ३९९ रुपयांचा नवा प्लान आणला आहे.

एअरटेलच्या या प्लानमध्ये दिवसाला १ जीबी ३जी/४जी डेटा, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉईस कॉल तसेच दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांसाठी असणार आहे. जिओच्या ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी ३जी/४जी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दिवसाला १०० फ्री एसएमएस आणि जिओ ऍपचं सबस्क्रिप्शन मिळत आहे. जिओच्या या प्लानची व्हॅलिडिटी ७० दिवसांची आहे.

Leave a Comment