रेल्वे गाड्याच्या नंबर मागचे रहस्य काय?


भारतीय रेल्वेचा पसारा बराच मोठा आहे. आपण नेहमी पाहतो की प्रत्येक रेल्वे गाडीला एक विशिष्ठ नंबर दिलेला असतो. अमुक नंबर अप, अमुक नंबर डाऊन असे उल्लेख करून या गाड्याच्या येण्या जाण्याचा घोषणा रेल्वे स्टेशन वर सतत होत असतात. प्रत्येक रेल्वे गाडीसाठी ५ आकडी नंबर असतो व त्यावरून संबधित गाडी संदर्भात बरीच माहिती मिळते. काय आहे या नंबर मागचे रहस्य ते जाणून घेऊया.
प्रत्येक रेल्वे गाडीला दिलेल्या नंबर मधील पहिला आकडा हा महत्वाचा असतो. पहिल्या आकड्यावरून त्या ठराविक गाडीची बरीचशी माहिती मिळते. हा आकडा शून्य असेल तर हि गाडी विशेष रेल्वे असते. या गाड्या उन्हाळा, थंडी, सण, उत्सव अश्या खास कारणांनी सोडल्या जातात व काही ठराविक काळासाठी त्या धावतात.

नंबर मधील पहिला आकडा १ असेल तर या गाड्या दीर्घ अंतराच्या असतात. एसी सुपरफास्ट गाड्यांचे नंबर १ पासून सुरु होतात. हा आकडा २ असेल तर त्या दीर्घ अंतराच्या एक्स्प्रेस गाड्या असतात. ३ आकड्यापासून नंबर असले तर या गाड्या कोलकाता व आसपासच्या परिसरात दिसतील कारण सबर्बन ट्रेन सिस्टीम साठी हा आकडा दिला गेला आहे.


दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद सारख्या मेट्रो सिटी साठी असलेल्या गाड्यांचे नंबर ४ या आकड्यापासून सुरु होतात. ५ आकड्याने सुरु होणारे नंबर पॅसेंजर गाड्यांचे असतात. या गाड्यात प्रवाशांसाठी विशेष सुविधा नसतात. ६ आकड्यापासून सुरु होणारे नंबर मॅमो म्हणजे दोन मोठ्या पण कमी अंतराच्या शहरादरम्यान धावणाऱ्या ट्रेन चे असतात. ७ आकडा डीएमव्ही अथवा रेल कार सेवा दर्शवितो.

८ या आकड्यापासून एखाद्या रेल्वेचा नंबर सुरु होत असेल तर ती गाडी पूर्णपाने आरक्षित सुपरफास्ट गाडी असते व तिला अगदी कमी थांबे असतात. ९ आकड्यापासून सुरु होणारे नंबर हे लिमिटेड भागासाठी असतात. मुंबई व सबर्बन ट्रेन साठी हा आकडा वापरला जातो.

Leave a Comment