गेली ५४ वर्षे अहोरात्र रामधून गाणारे हनुमान मंदिर


गुजराथच्या जामनगर मधील रणमल सरोवराजवळ असलेले अतिप्राचीन हनुमान मंदिर एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाले आहे. येथे गेली ५४ वर्षे अहोरात्र रामधून म्हटली जात आहे व २००१ साली गुजराथेत आलेल्या विनाशकारी भूकंपातही त्यात खंड पडला नव्हता. अखंड रामधून म्हणण्याचा विक्रम या मंदिराने केला असल्याने त्याची नोंद गिनीज बुक मध्ये घेतली गेली आहे.


या मंदिराची स्थापना १५४० साली झाल्याचे पुरावे आहेत. म्हणजे हे मंदिर प्राचीन आहे. १९६४ साली श्री भिक्कुजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व १ ऑगस्ट१९६४ पासून येथे अखंड रामधून म्हटली जाऊ लागली. श्रीराम जय राम जयजय राम चा जप येथे गेली ६४ वर्षे दिवसचे २४ तास सुरु आहे व आता हीच या मंदिराची परंपरा बनली आहे. सर्वसामान्य भाविकच यात सहभागी होतात व कुणीही इच्छुक येथे या उपक्रमात सहभागी होऊ शकतो.

Leave a Comment