मॉरिशसमधून भारतात सर्वाधिक गुंतवणूक


रिझर्व बँकेने शुक्रवारी सादर केलेल्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक अहवालात भारतात आत्तापर्यंत आलेले सर्वाधिक परदेशी गुंतवणूक मॉरीशस या आपल्या जवळच्या छोट्या देशातून आली असून त्यानंतर अमेरिका, युके, सिंगापोर व जपान या देशांचा नंबर आहे. विशेष म्हणजे भारतीयांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी मॉरिशस हे सर्वाधिक पसंती असलेले ठिकाण असल्याचे दिसून आले आहे.

भारतात २०१६-१७ या काळात जेवढी परदेशी गुंतवणूक झाली आहे, त्यात मॉरिशसचा हिस्सा २१.८ टक्के आहे. रिझर्व बँकेने यासाठी १८६६७ कंपन्यामधील १७०२० कंपन्यांची म्हणजे मार्च २०१७ ला आर्थिक वर्ष संपलेल्या कंपन्यांची गुंतवणूक स्थिती विचारात घेतली होती. त्यातील ९६ टक्के कंपन्या लिस्टेड नाहीत म्हणजे या कंपन्या छोट्या आहेत. मात्र याच कंपन्यात अधिक परदेशी गुंतवणूक झाली आहे. भारतातून परदेशात जेथे सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे त्यात सिंगापोर प्रथम क्रमांकावर आहे.

Leave a Comment