बीएस ६ मानकाची पहिली मर्सिडीज पुण्यात लाँच


लक्झरी कार निर्माती मर्सिडीज बेन्झने त्यांची बीएस ६ मानकांसह बनविलेली पहिली मेड इन इंडिया कार पुणे येथे लाँच केली. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. भारत सरकारने २०२० ची सीमा बीएस ६ मानाकांसाठी ठरविली असून या मानकांसह बाजारात कार आणणारी मर्सिडीज पहिली कंपनी ठरली आहे.

मर्सिडीज ला यंदाचे केंद्रीय मोटार वाहन नियम पालानासाठीचे ऑटो रिसर्च असोसिअशन ऑफ इंडिया तर्फे दिले जाणारे सर्टीफिकेटही देले गेले आहे. बीएस ६ मानकानुसार बनविल्या जाणारया वाहनामुळे नायट्रोजन ऑक्साईडच्या उत्सर्जन प्रमाणात ६८ टक्के तर कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रमाणात १३ टक्के घट होणार आहे. परिणामी हवा प्रदूषण कमी होणार आहे.

Leave a Comment