वाळूच्या किल्ल्यात राहतो हा सडाफटिंग राजा


कधीकाळी ब्राझील ला जाण्याची संधी आलीच तर रिओ ड जनेरोला आवर्जून भेट द्या आणि तेथे गेली २२ वर्षे वाळूचा किल्ला बांधून राहणाऱ्या स्वघोषित राजाची गाठ घ्यायला विसरू नका. मर्सिया मटोलीअस नावाचा हा गृहस्थ सडाफटिंग आहे म्हणजेच त्याच्या मागे कुटुंबाचा लबेदा नाही. तो स्वतः ला राजा म्हणतो व तेथील लोकही त्याला द किंग नावाने ओळखतात. येथे येणाऱ्या पर्यटकांचे तो आकर्षण बनला आहे.

मार्सियाला समुद्र आवडतो. ४४ वर्षीय मार्सियाने नुकतीच एका चॅनल ला मुलाखत दिली. तो म्हणतो समुद्र किनाऱ्यावर राहायला मिळावे म्हणून लोक भरपूर पैसे खर्च करतात. मी पैसे खर्च न करताच ते सुख अनुभवतो. त्याने वाळूचा किल्ला तयार केला आहे व तो चांगला टिकवा म्हणजे वाळू वाळून कोसळू नये म्हणून सतत त्यावर पाणी शिंपडतो. या किल्ल्याबाहेर मुकुट घालून मार्सियो एका राजेशाही खुर्चीवर बसून असतो. तो तीन उद्योग करतो. मासे पक्स्डतो, पुस्तके वाचतो आणि गोल्फ खेळतो.

त्याची अडचण एकाच आहे. ती म्हणजे उन्हात वाळू तापते त्यामुळे त्याला किल्ल्यात झोपता येत नाही व अश्यावेळी समुद्र किनाऱ्यावरील किडे मुंग्याच्या सहवासात त्याला रात्र काढावी लागते. मग भेटाल ना या राजाला?

Leave a Comment