स्प्लिट व्ह्यू चा कॅमन आय स्मार्टफोन


चीनी मोबाईल निर्माती कंपनी ट्रान्सन होल्डीन्ग्स्ने भारतीय बाजारात टेक्नो मोबाईल ब्रांड खाली अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. या कंपनीने त्यांचा नवा हँडसेट कॅमन आय भारतीय बाजारात आणला आहे. या फोन ची किंमत ८९९० रु. असून तो मिडनाईट ब्ल्यू, सिटी ब्ल्यू व गोल्डन शँपेन रंगात उपलब्ध आहे.

या फोनसाठी ५.६५ इंचाचा स्प्लिट डिस्प्ले दिला गेला आहे व तो १८.९ रेशो मध्ये आहे. ३ जीबी रॅम ,३२ जीबी स्टोरेज, क्वाड फ्लॅश सह १३ एमपी चा रिअर कॅमेरा, व्हिडीओ कॉलिंग, सेल्फी साठी १३ एमपी चा फ्रंट कॅमेरा, ३०५० एमएएच ची बॅटरी, अँड्राईड नगेत ७.०, जीपीएस, वायफाय, ब्ल्यू टूथ, युएसबी अशी त्याची अन्य फीचर्स आहेत.

Leave a Comment