प्रवास करताना देखील राहा फिट

travel
आपल्या दिनक्रमामध्ये व्यायामाला आपण वेळ देत असतो. मात्र प्रवास करीत असताना व्यायामाचे हे वेळापत्रक काहीसे डळमळीत होते. कधी वेळी अवेळी प्रवास केल्याने व्यायामासाठी वेळ मिळत नाही, तर कधी आपल्या आहारामध्ये आपण नेहमी समाविष्ट करीत असलेले पदार्थ सहज उपलब्ध नसल्याने, जे काही उपलब्ध असेल, त्यावर वेळ निभावून न्यावी लागते. पण काही सोप्या उपायांनी तुम्ही प्रवास करीत असताना देखील आपल्या फिटनेसची काळजी घेऊ शकता.
travel1
पुष्कळदा प्रवास करीत असताना आपले नेहमीचे वेळापत्रक अगदीच गडबडून जाते. खाण्या-पिण्याच्या, झोपेच्या वेळा बदलून जातात. जर कामानिमित्त प्रवास करीत असाल, तर मिटींग्स, कॉन्फरन्स सांभाळताना वेळेचे भानच रहात नाही. अश्या वेळी सर्वप्रथम आपले वेळापत्रक जितके पाळता येईल तितके पाळण्याचा प्रयत्न करा. सुट्टीनिमित्त प्रवास करीत असताना पुष्कळदा सकाळी उशीरा उठल्याने सकाळचा नाश्ता करायचा राहून जातो. सकाळचा नाश्ता हे आपल्या दिवसातील सर्वात महत्वाचे भोजन आहे. त्यामुळे हे वेळेवर होईल ह्याची काळजी घ्या.
travel2
पण जिथे प्रवासाला जाणार असू, तेथील स्थानिक खाद्यपरंपरेविषयी आधीपासून माहिती करून घ्या. विमानप्रवासादरम्यान मद्यपान करू नका. मद्यप्राशनामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे मद्यपान करायचेच असेल, तर प्रमाणात करा. सुट्टीवर असलो, की नेहमी पाळत असलेल्या आहारनियमांचे उल्लंघन होणे साहजिक आहे. पण आपल्याला जे हवे त्या पदार्थांचा आस्वाद घेताना पदार्थ प्रमाणात खावा. जर खाण्या-पिण्याच्या बाबतीत तुम्ही चोखंदळ असाल, तर स्वयंपाक स्वतः करता येईल अशी सोय असलेले हॉटेल/ एअर बीएनबी राहण्यासाठी निवडावे.
travel3
मधल्या वेळेच्या भुकेसाठी झटपट बनणारे हेल्दी स्नॅक्स बरोबर ठेवावे. आपण राहत असेलेल्या हॉटेल मध्ये जर जिम असेल, तर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. स्थानिक, जवळपासची पर्यटनस्थळे फिरून बघण्यासाठी शक्यतो पायी जाण्याचा विचार करा, किंवा सायकलचा पर्याय स्वीकारा. सुट्टीवर जाताना वर्कआऊट करण्यासाठी साधी, सोपी साधने बरोबर न्या. स्किपींग रोप, योगा मॅट, किंवा जॉगिंग साठी स्नीकर्स बरोबर ठेवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment