हृदयविकाराच्या झटक्याची आपले शरीर देते काही काळ आधीच पूर्वसूचना


आजकाल सतत कधी न पाहिलेले किंवा ऐकलेले नवनवीन आजार आणि विकार आढळून येत असतात. यांच्या उपचारपद्धती शोधून काढण्याचे कार्य वैज्ञानिक सतत करीत असतात. कोणता ही विकार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणे क्रमप्राप्तच असते, पण जर विकार उद्भविण्या अगोदर, त्याची लक्षणे ओळखून त्यानुसार उपचार करण्यात आले, तर पुढे उद्भविणाऱ्या समस्या टळू शकतात. हृदय विकाराचा झटका देखील योग्य काळजी घेतल्याने रोखता येऊ शकतो. ह्रदय विकाराचा झटका येणार असल्याच्या काही खुणा आपले शरीर आपल्याला काही काळ आधीपासूनच पटवून देत असते. या खुणांकडे वेळेवर लक्ष दिले, तर पुढे संभवणारा धोका टाळता येऊ शकतो.

तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल, तर मेंदूला व हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होत असण्याची शक्यता असू शकते. असे असेल, तर अधून मधून अचानक घाम फुटणे, किंवा जीव घाबरा होणे, चक्करल्यासारखे होणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. ही लक्षणे थोड्याच अवधीमध्ये ठीक झाली नाहीत, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदय विकाराचे महत्वाचे लक्षण म्हणजे छातीवर दबाव पडणे, किंवा प्रेशर येणे. याला अँजिना असे म्हटले जाते. जेव्हा हृदयाला रक्तातून प्राण वायूचा पुरेसा पुरवठा होत नाही, तेव्हा हे लक्षण उद्भवते. बहुतेक वेळी अपचन किंवा गॅसेस मुळे पोटात किंवा छातीत दुखत असेल अशी लोकांची समजूत होते. गॅसेस मुळे येणारे प्रेशर काही काळाने कमी होते. पण जर असे झाले नाही, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जर अचानक घाम फुटून थकवा जाणवू लागला, किंवा मळमळू लागले, जबडा दुखू लागला, तर हे हृदयविकाराचा झटका येणार असल्याचे हे लक्षण असू शकते. हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने हे लक्षण उद्भवू शकते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. तसेच हृदयाला देखील नीट रक्तपुरवठा होत नाही. सतत थकवा, बारीक ताप, आणि छातीत दुखणे अश्या तक्रारी सुरु राहिल्या तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment