भारतांतर्गत आणि भारताबाहेर विमान प्रवास करणाऱ्यांना मिळणार वाय-फाय सुविधा


नवी दिल्ली – ट्रायने भारतांतर्गत विमान प्रवास करणा-या तसेच भारताबाहेर विमान प्रवास करणाऱया सर्व प्रवाशांना विमान प्रवासात वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या प्रवाशांना विमान कंपन्या ही सवलत काही अटींसह देऊ शकतात. सुरक्षेसंबंधातील या अटी प्रामुख्याने आहेत. ही सुविधा विमानाने आकाशात उड्डाण केल्यानंतर विमान आकाशात असेपर्यंत दिली जाऊ शकते.

वाय-फाय बरोबरच विमान प्रवासात मोबाईलवरून बोलण्याची सुद्धा सुविधा देण्यात येणार आहे. विमान आकाशात ३००० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर असेपर्यंत मोबाईलचा उपयोग केला जाऊ शकतो. विमान कंपन्यांना यासाठी काही तांत्रिक आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. प्रवाशांना यापैकी कोणती सुविधा उपलब्ध करून द्यावयाची, हे विमान कंपन्यांनी स्वतः ठरवायचे आहे. वाय-फाय सुविधेला जगातील अनेक प्रवासी विमानसेवा प्राधान्य देतात. विमानात मोबाईल वापरण्याची अनुमती दिल्यास गोंगाट वाढतो, असा अनुभव असल्याने काही विमान कंपन्यांनी ही सुविधा नाकारली आहे, असेही ट्रायच्या अधिकाऱयाने सांगितले.

Leave a Comment