आला ४०० मेगापिक्सलचा कॅमेरा


स्मार्टफोन म्हणजे जीवन अशी परिस्थिती असलेल्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना प्रथम चौकशी होते ती फोन मध्ये कॅमेरा किती पिक्सल चा आहे याची. आता अगदी ५ पासून ते २५ मेगापिक्सल चे कॅमेरे फोन मध्ये आले आहते. मात्र जगातला सर्वाधिक मेगापिक्सल चा कॅमेरा लौंच करण्याचे श्रेय गेले आहे हसलब्लंड (hassselbland) कंपनी कडे. त्यांनी चक्क ४०० मेगापिक्सल चा कॅमेरा आणला असून यातून काढलेले फोटो इतके मोठे येतात कि त्याने स्मार्टफोन दोन ते चार जीबी ची सगळी मेमरी फुल होऊ शकते.

हा मल्टीशॉट कॅमेरा असून त्यातून ६ मल्टी शॉट फोटो एकत्र जोडून ४०० एमपी चा विशाल फोटो काढला जातो. याच कंपनीने दोन वर्षापूर्वी २०० एमपी चा कॅमेरा लौंच केला होता. नव्या कॅमेर्यातून १०० एमपी चे चार फोटो काढण्याचे ऑप्शन आहे. हा कॅमेरा युएसबी पोर्ट ने संगणकाला जोडावा लागतो. या कॅमेर्याने व्हिडीओ चित्रण करता येते. या कॅमे-याची किंमतही तशीच वजनदार म्हणजे साधारण ३० लाख ६५ हजार इतकी आहे.

Leave a Comment