रिलायंस जिओला प्रथमच नफा


रिलायंस इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओने २०१७-१८च्या तिसरया तिमाहीत ५०४ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. सप्टेबर मध्ये संपलेल्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचे नुकसान झाले होते. तेलापासून ते टेलिकॉम सेक्टर पर्यत व्यवसाय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड चा एकूण नफा २५ टक्के वाढून डिसेम्बर अखेरी ९४२३ कोटींवर गेला आहे. गात वर्षी याच काळात हा नफा ७५३३ कोटी होता.

रिलायंस चे अध्यक्ष मुकेश अंबानी या वेळी बोलताना म्हणाले जानेवारी १९७८ ला कंपनी लिस्ट झाल्याला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा आमचा महसूल २१.७४ टक्के वाढून १.०२,५०० कोटींवर गेला आहे. आमचे काम समाधानकारक आहे व आम्ही नफा कमावण्याची परंपरा कायम राखली आहे याचा आनंद वाटतो .

Leave a Comment