मुंबई : ई कॉमर्स संकेतस्थळांवर रिपब्लिक डे आणि लॉन्ग विकेंडचे औचित्य साधून अनेक साईटवर सेल सुरु झाले आहेत. अनेक बंपर सेल फ्लिपकार्ट, अमेझॉनवर सुरू झाले आहेत. या सेलमध्ये अनेक महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसघशीत सूट मिळणार आहे. कार्बन मोबाईलच्या टाईटेनियम सीरीजमधील स्मार्टफोनवरही या ऑफरमध्ये या जंबो सेलमध्ये सूट देण्यात आली आहे. ४४९१ रूपयांची सूट या सेलमध्ये या फोनवर देण्यात आली आहे.
अवघ्या २९९९ रूपयांमध्ये मिळणार १३ मेगापिक्सलचा स्मार्टफोन
२१ ते २३ जानेवारीदरम्यान फ्लिपकार्टवर हा सेल सुरू असणार आहे. १३ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमर्याच्या या फोनमध्ये ४००० mAhच्या क्षमतेची बॅटरी आहे. हा फोन फ्लिपकार्टवर २९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. कार्बन टाईटेनियम जम्बो फोन ऑक्टोबर २०१७ मध्ये दाखल झाला होता. कंपनीने हा फोन रिलीज केला तेव्हा त्याची किंमत ६४९० होती.