झारखंडचे ९९ वर्षीय आजोबा चक्क माती खाऊन जगतात


साहेबगंज – दररोज सुमारे १ किलो माती झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेले करू पासवान हे वृद्ध गृहस्थ खातात. मी ११ वर्षांचा असतानाच मला माती खाण्याची सवय लागली. गरिबीमुळे सुरू झालेला हा प्रकार पुढे जाऊन सवय बनल्याचे १९१९ साली जन्म झाल्याचा दावा करणाऱ्या करू यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला करू पासवान यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी फार निराश झालो होतो. दहा मुलांना मला पोसावे लागत असल्यामुळे मरून जावे असे वाटायचे म्हणूनच मग माती खायला सुरूवात केली. पण मला नंतर त्याचे व्यसनच लागले. मग मी स्वतःला त्यापासून दूर ठेवू शकलो नाही. करू यांचा मोठा मुलगा सीयाराम पासवान यांनी सांगितले की, त्यांना अनेकवेळा थांबवण्याचा प्रयत्न कुटुंबातील सदस्यांनी केला, परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

विशेच म्हणजे करू यांची तब्येत या विचित्र सवयीनंतरही चांगली तंदुरुस्त आणि निरोगी आहे. बिहारच्या सबूर कृषी विद्यालयाकडून २०१५ मध्ये त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. ‘पीका सिंड्रोम’मुळे कारू यांची ही अखाद्य पदार्थ खाण्याची सवय असल्याचे सांगितले जाते. त्या व्यक्तीस यात कोणतेही पौष्टीक मूल्य नसलेले अखाद्य पदार्थ खाण्याची इच्छा होते.

Leave a Comment