युक्टन व्दीपकल्पात सापडली प्राचीन गुहा


मेक्सिको सिटी – पुरातत्व विभागाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठी पाण्याखाली असलेली प्राचीन गुहा शोधल्याचा दावा केल्यामुळे प्राचीन माया संस्कृतीचा अभ्यास करणे शक्य ठरणार आहे.

संशोधकांचा ‘ग्रेट माया एक्विफर प्रोजेक्ट'(जीएएम) हा अभ्यासगट गेल्या काही वर्षांपासून मेस्किकोच्या युक्टन व्दीपकल्पाचा अभ्यास करत होता. तुलूम येथे सॅट अॅक्टून आणि डॉस ओजोसची या गुहांचा या संशोधनादरम्यान शोध लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तब्बल २१६ मैल इतकी युक्टन द्विपकल्पातील या गुहेची लांबी आहे. पाण्याखालील प्राचीन गुहेच्या शोधामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे पुरावे हाती आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.