व्हॉट्सअॅपचे आता स्वतंत्र बिझनेस अॅप


ऑनलाईन छोटे व्यवसाय करणाऱ्यांना फेसबुकमुळे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे या व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली. यामध्ये व्हॉट्सअॅपचा आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी किंवा आपल्या प्रॉडक्टचे फोटो शेअर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर वापर होतो.

व्हॉट्सअॅप आता याचाच विचार करुन स्वतंत्र बिझनेस अॅप घेऊन येणार आहे. छोटे व्यवसाय करणाऱ्यांना ज्याद्वारे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. हे अॅप आज (शुक्रवार) इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, अमेरिका या देशांमध्ये लाँच होणार असून मात्र भारतात हे अॅप वापरण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. हे अॅप अॅपल आणि अॅंड्रोईड दोन्हीवर वापरता येणार आहे.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये विनाशुल्क डाउनलोड करता येणार आहे. हे अॅप छोट्या व्यवसायांचा विचार करुनच तयार करण्यात आले आहे. आपल्या प्रॉडक्टचे वर्गीकरण करणे, ऑटो रिप्लाय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे ग्राहकांना रिप्लाय करणे यामुळे सोपे होणार आहे.

Leave a Comment