२९ वस्तूंवरील करांमध्ये जीएसटी समितीने केली कपात


नवी दिल्ली – २९ वस्तूंवरील करांमध्ये जीएसटी समितीने कपात केली असून अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी जीएसटी समितीची बैठक पार पडल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

या वस्तू विविध प्रकारच्या ५३ वर्गवारीतील असून यामध्ये प्रामुख्याने हस्तकलेच्या वस्तुंचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या बैठकीत पेट्रोल डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आणायचे की नाही, याबाबत चर्चा झाली नाही. मात्र १० दिवसानंतर जीएसटी समितीची दुसरी बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये याविषयी चर्चा करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हे नवीन दर २५ जानेवारीपासून अंमलात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment