फेसबुक सेल्फीमुळे मारेकरी महिलेला अटक


फेसबुकवर पोस्ट केलेल्या सेल्फीत दिसलेल्या शस्त्रावरून खुनी महिलेचा छडा लावण्यात कॅनडातील पोलिसांना यश आले आहे. तिला या खुनाबद्दल सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

चेयेन रोझ अँटोईन असे या महिलेचे नाव असून ती २१ वर्षांची आहे. तिच्या ब्रिटनी गॅर्गोल नावाच्या १८ वर्षांच्या मैत्रिणीचा खून करण्याचा तिच्यावर आरोप असून या महिलेने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे.

सॅस्काटून या गावात मार्च २०१५ मध्ये ब्रिटनी हिचा गळा आवळलेला मृतदेह आढळून आला होता. अँटोईनचा पट्टा तिच्या मृतदेहाशेजारी आढळला होता.

अँटोईनने चेयेनसोबत एक सेल्फी फेसबुकवर प्रकाशित केली होती. चेयेनचा मृत्यू होण्याच्या काही तास आधी घेतलेल्या या सेल्फीत तिने तोच पट्टा घातलेला दिसत होता. त्यावरून पोलिसांनी तिच्यावर संशय घेतला, असे टोरोंटो सन या वृत्तपत्राने म्हटले आहे.

अँटोईन हिने पोलिसांना खोटी कथा सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सेल्फीवरून तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी फेसबुक पोस्टचा माग काढत खरी माहिती शोधून काढली.

आम्ही दोघांनीही खूप दारू घेतली होती आणि मारिजुआनाचे सेवन केले होते. त्यावेळी आमच्यात वाद झाला. मी तिचा गळा आवळून खून केला, हे खरे आहे मात्र मी नक्की काय केले हे मला आठवत नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.

Leave a Comment