रशियात पडली रक्त गोठवणारी थंडी


मॉस्को – पापण्या गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या रशियामधील नागरिक घेत आहेत. लोकांवर कडाक्याच्या थंडीमुळे घरातच कैद राहण्याची वेळ आली आहे. मंगळवारी रशियामध्ये – ६७ अंश तापमानाची नोंद झाली होती. अन्य भागांतही तापमान शून्य ते उणे ५० अंशांपर्यंत खाली गेले आहे.

सर्वात थंड भागांमध्ये रशियामधील यकुतिया या भागाचा समावेश होतो. १० लाख लोकसंख्येचा हा भाग असून येथील विद्यार्थी उणे ४० तापमान असून शाळेत जातात. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने येथील लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. रशियामधील ओयम्याकोन गावातही उणे ६७ तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९३ मध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे उणे ७१ तापमानाची नोंद झाली होती.


याची महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही दखल घेत सायबेरियातील या परिस्थितीबाबत ट्विट केले आहे. उणे ६२ इतक्या निच्चांकी तापमानातही ओयम्याकोन या गावातील ५०० लोक राहतात आणि अशा परिस्थितीतही तेथे काम करतात. आपल्या परिस्थितीबाबत तक्रार न करण्याबाबत ते आपल्याला शिकवू शिकतील असे त्यांनी म्हटले आहे.