आता गुगल करेल ‘आयटी’त नोकरी मिळवायला मदत


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगल आणि ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी कोर्सेराने बुधवारी नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा केली. यातून माहिती तंत्रज्ञान आरंभिक रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

कुठलाही पूर्वानुभव नसलेल्या युवकांनाही केवळ आठ ते 12 महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात नोकरी मिळविणे या अभ्यासक्रमातून शक्य होणार आहे. या योजनेनुसार प्रशिक्षणार्थी आपली माहिती प्रमुख कंपन्यांना देऊ शकतील, यात बँक ऑफ अमेरिका, वालमॉर्ट, स्प्रिंट, जीई डिजिटल, पीएनसी बँक, इन्फोसिस व यूपीएमसी अशा कंपन्यांचा समावेश आहे.

सुपात्र आयटी तंत्रज्ञ शोधणे हे अनेक कंपन्यांसाठी आव्हान असते. आयटी समर्थित किंवा सहयोगी क्षेत्रात 1,50,000 रोजगार असून देशातील सर्वाधिक वेगाने वाढत्या रोजगार क्षेत्रात त्याचा समावेश आहे, असे गुगलचे अधिकारी बेन ब्रॉयड म्हणाले.

डिजिटल इंडिया अभियान आणि मोबाईल डेटाच्या उतरत्या किमती यांमुळे ऑनलाईन शिक्षणाचे क्षेत्राने वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

Leave a Comment