अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल फेसबुकच्या तक्रारीवरून १००० जणांवर खटला


डेन्मार्कमध्ये फेसबुकवरून अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल1000 मुलां-मुलीवर खटला दाखल करण्यात आला आहे. यात 800 मुले आणि 200 मुलींचा समावेश असून ते दोषी ठरले, तर त्यांना 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

ही सर्व मुले 15 ते 20 वर्षांपर्यंतची आहेत. त्यांची चित्रफीत 2015 ते 2017 पर्यंत मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली होती. त्यांचा सेक्स व्हिडीओ आणि त्यासोबतची छायाचित्रे फेसबुकच्या मेसेजिंग सेवेद्वारेही व्हायरल झाल्याची तक्रार कंपनीने केली आहे.

या संदर्भातील दोन चित्रफीती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या होत्या. त्यात 15 वर्षांचे मुलगा व मुलगी अंतरंग स्थितीत दिसत होते.
दोन युवक-युवती या क्लिपमध्ये आपत्तिजनक अवस्थेत दिसत असल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

याबाबतची मूळ तक्रार फेसबुकने अमेरिकी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर यूरोपोलच्या (यूरोपियन यूनियन लॉ इन्फोर्समेंट एजन्सी) माध्यमातून हे प्रकरण डेन्मार्कला पोचले.

डेन्मार्कमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लैंगिक साहित्याला गुन्हा मानले जाते. यासाठी कमाल सहा वर्षांची शिक्षा आहे. या प्रकरणात मुले-मुली दोषी आढळले, तर त्यांना दंड भरावा लागेल किंवा तुरुंगात जावे लागेल. दोषी व्यक्तींना दंड किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षाही होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment