येत्या काही वर्षांमध्ये गायब होणार या वस्तू


घरामध्ये काही प्रसंगी घरामधील सर्व मंडळी एकत्र आली, की गप्पाष्टक रंगतेच. त्यातून आजी आजोबा किंवा घरातील इतर वडीलधारी मंडळी गप्पांमध्ये सहभागी झाली, की त्यांच्या वेळच्या गोष्टी, त्यांच्या आठवणी ऐकण्यात वेळ कुठल्या कुठे निघून जातो. आपल्या आजी आजोबांच्या काळातील किती तरी वस्तू आता कालातीत झाल्या आहेत. अश्याच आपल्यावेळी सध्या पाहायला मिळत असलेल्या वस्तू कदाचित आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळणार नाहीत.

सध्या ‘डिजिटल मनी’ किंवा प्लास्टिक मनीच्या वापराकडे सर्वांचा जास्त कल दिसून येत आहे. काही दशकांनी सध्या चलनात असलेल्या नोटा आणि नाणी कदाचित केवळ संग्राहकांकडे पाहायला मिळतील. काही दशकांनंतर पैश्याची सर्व देवाणघेवाण ऑनलाईन होईल, आणि चलनातील नाणी, किंवा नोटा दुर्मिळ होतील. तसेच पुढील काही दशकांमध्ये व्यक्तीच्या सहीच्या ऐवजी व्हॉईस रेकग्निशन, रेटीना स्कॅन इत्यादी गोष्टीं व्यक्तीची ओळख पटवतील.

टीव्ही रिमोटवरून सर्वच घरांमध्ये कधी ना कधी वादावादी होत असते. पण आता काही वर्षातच टीव्ही रिमोट दिसेनासे होऊन व्हॉईस अॅक्टीव्हेशन वर टीव्ही सुरु किंवा बंद करणे, त्यावरील चॅनल बदलणे शक्य होणार आहे, तसेच घरातील इतर विद्युत उपकरणे देखील व्हॉईस कमांडवर चालू शकणार आहेत. अगदी घरातील दिवे, पंखे देखील..!

रेस्टॉरंटमध्ये जेवण सर्व्ह करण्यासाठी रोबोट्स आणले जाणार आहेत. किंबहुना परदेशातील अनेक रेस्टॉरंट्स मध्ये याची सुरुवातही झाली आहे. सध्या हे रोबोट्स पर्यटकांचे आकार्षांबिंदू ठरत आहेत, पण येत्या काही दशकांमध्ये हे रोबोट्स बहुतेक सर्व ठिकाणी नजरेस पडणार आहेत. तसेच रस्त्यावरील वाहतुकीची गुंतागुंत चालकविरहित ( ड्रायव्हरलेस कार्स ) आल्याने मोठ्या प्रमाणात सुरळीत होऊ शकणार आहे.

Leave a Comment