३१ जानेवारीला अवकाशात दिसणार अद्भूत दृश्य


मुंबई : २०१८ वर्षातील जानेवारी महिना खगोलप्रेमींसाठी पर्वणीचा ठरणार असून या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसेल. सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही खगोलप्रेमींना पाहायला मिळणार आहे. ‘ब्लड मून’ असे याला खगोलीय भाषेत म्हटले जाते.

चंद्र ३१ जानेवारी रोजी लाल रंगाचा असेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा २० वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. चंद्र पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झाले तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असे नाव खगोल शास्त्रज्ञांनी याला दिले आहे.

बहुतांश चंद्रग्रहणे ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण ३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतात अर्धच दिसणार आहे. सकाळी ६.२० वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. तर ९.३० वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे.

Leave a Comment