आता एका क्लिकवर पतंजलीची उत्पादने


नवी दिल्ली – आपल्या स्वदेशी उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीला चालना देण्यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ई-कॉमर्स वेबसाईट्सोबत करार केला आहे. आता पे-टीएम मॉल, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, अॅमेझॉन, नेटमेड्स, १ एमजी, शॉपक्लूज या ऑनलाईन वेबसाइटवर पतंजली आयुर्वेदची उत्पादने उपलब्ध असतील.

रामदेव बाबा या कराराबाबत म्हणाले, की पारंपरिक रिटेल बाजाराच्या विस्तारासह सोयीस्कर आणि कार्यक्षम पर्याय ग्राहकांना प्रदान करणे हा ऑनलाईन तंत्रज्ञानाशी करार करण्यामागचा उद्देश आहे. लोक आजकाल जे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट्स वापरण्यास प्राधान्य देतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास या नवीन यंत्रणेचा फायदा होईल, असे मत पतंजलीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी व्यक्त केले.

Leave a Comment