पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ


नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत होत असून या दरवाढीने सोमवारी उच्चांक गाठला आहे. दिल्लीत सोमवारी नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला आहे. तर ७१ रूपयांचा टप्पा पेट्रोलने ओलांडला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला या वाढलेल्या दरांमुळे कात्री लागणार एवढे मात्र नक्की.

पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांच्या दर तक्त्यानुसार ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल आणि डिझेल महाग मिळते. त्यामुळे सध्या मुंबईत प्रती लीटर डिझेलची किंमत ६५.७४ रूपयांवर पोहोचली आहे. याची तुलना करायची झाल्यास गेल्या महिन्याभरात डिझेलच्या प्रती लीटर दरात ३.४० रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत २.०९ रूपयांनी वाढली आहे. तर पुण्यात ७८.८९ तर डिझेल ६४.६६ रुपये प्रतिलिटर होते. पुण्यात शनिवारी पेट्रोल ७९ रुपये तर डिझेल ६४ रुपये प्रतिलिटर एवढे होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर १२ डिसेंबर २०१७ पासून सातत्याने वाढत आहेत.

Leave a Comment