कॅनडातील एका शहरात राहतात केवळ ४ व्यक्ती


भारतातील एखाद्या शहराची लोकसंख्या विचारली की मग सुरु होतात लोकसंख्या वाढल्याच्या चर्चा आणि ती कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याचे उपायही सुचविण्यात येतात. देशाच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे हैराण झालेले अनेक नागरिक परदेशात जाणे पसंत करतात. भारत आणि चीनमध्ये हे चित्र असताना परदेशात अनेक ठिकाणी लोकसंख्या कमी असल्याने ती वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला एका देशातील अशा शहराची माहिती देणार आहोत जी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क होणार आहात. कारण केवळ ४ व्यक्ती कॅनडातील एका शहरात राहतात.

विश्वास नाही ना बसत तुमचा…, पण कॅनडात असे शहर प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे. टिल्ट कोव असे या शहराचे नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि ऐवढी लोकसंख्या म्हटल्यावर येथे सुख सुविधांचा अभाव नक्कीच असणार. पण शहरात पोस्ट ऑफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळे काही आहे. हे चारही नागरिक या शहरात या जागेची देखभाल करण्यासाठी राहतात.

हे शहर एकेकाळी खूप गजबजलेले असायचे पण याठिकाणच्या खाणउद्योगावर १९६७ नंतर संकट कोसळल्यामुळे या शहरातील लोकांनी स्थलांतर करून दुस-या शहराच्या शोधात निघाले आणि टिल्ट कोव हे शहर ओस पडू लागले. पण सध्या या शहरात लोक नसले तरी शहराची भौतिक रचना मात्र जशीच्या तशी राहिली असल्यामुळे या शांत शहरालाही उत्सुकतेपोटी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या ठिकाणी डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पहायला मिळतो. टोरांटोपासून रस्त्याने दोन ते तीन तासांच्या अंतरावर हे ठिकाण असल्यामुळे काही निमित्ताने तुम्ही कॅनडामध्ये गेलात तर नक्की या शहराला भेट द्या.

Leave a Comment