अमेझॉनमध्ये होणार बंपर नोकर भरती !


मुंबई : ई कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे आजकाल ग्राहकांचा कल वाढला असल्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांकडून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास बंपर ऑफर्सची घोषणा केली जाते.

Amazon.in चा ग्रेट इंडियन सेल २०-२४ जानेवारीपासून मध्ये सुरू होत आहे. या सेलदरम्यान पॅकिंग, डिस्ट्रिब्युशनवर येणारा ताण पाहता अमेझॉनने तात्पुरते स्वरूपाची नोकर भरती सुरु केली आहे. याकरिता ५५०० जागांसाठी भरती होणार आहे. अमेझॉनने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेलआधीच याची सोय करण्याची तयारी केली आहे. १००० सहाय्यकांना कंपनीच्या कस्टमर केअरमध्येही काम दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि मागण्यावेळीच पूर्ण केल्या जातील. भारतातील प्रमुख मेट्रो सिटींप्रमाणेच हैदराबाद आणि बंगळूरूमध्ये भरती होणार आहे.

Leave a Comment