जपानची जबरदस्त कार भारतात लाँच


नवी दिल्ली : भारतात आपली लग्जरी कार LS 500h जपानची प्रसिद्ध कार कंपनी लेक्ससने लाँच केली आहे. भारतात लेक्ससचा 500h सोबतचे येणारे हे पाचवे उत्पादन आहे.

१.७७ कोटींच्या घरात भारतात या कारची एक्स शो रूम किंमत आहे. २ वेरिएंट्समध्ये या कार उपलब्ध आहेत. ही एक स्टाईलस सिडेन आहे.शार्प कॅरेक्टर लाइन्स, एलईडी हेडलॅम्प्स आणि २० इंचचे अलॉय व्हिल या सारखे फीचर ज्यामध्ये आहेत. प्रीमियम असा या गाडीचा लुक आहे. यामध्ये एअर सस्पेंशन देण्यात आले आहे. हायब्रिड फॉर्मवर ही कार उपलब्ध होईल. वी६ पेट्रोल हायब्रिड यूनिट या कारमध्ये देण्यात आले आहे.

आतापर्यंत लाँच केलेल्या कारमध्ये कंपनीची LS 500h ही हायब्रिड कार असून २०१७ मध्ये डेट्रॉयट मोटर शोमध्ये या कारची झलक दाखवण्यात आली होती. कंपनीच्या LS 500h या कारची स्पर्धा बीएमडब्ल्यू ७ सीरीज, मर्सेडीज, ऑडीच्या लग्‍जरी गाड्यासोबत आहे.

Leave a Comment