नवी दिल्ली – आता केवळ ९९ रुपयांमध्ये देशातील प्रमुख शहरांत विमान प्रवास करता येणे शक्य होणार आहे. एअर ही खास ऑफर प्रवाशांना एशिया विमान कंपनीने दिली आहे. याकरिता १५ जानेवारी ते ३१ जुलैदरम्यान तिकीटे बुक करता येणार आहे.
केवळ ९९ रुपयांमध्ये देशातील प्रमुख शहरांत विमान प्रवास
एअर एशियाच्या विमानाने बंगळुरु, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांची या सात ठिकाणी प्रवास करायचा असल्यास ९९ रुपयांपासून प्रमोशनल तिकीटदर सुरू झाला आहे. भारतातून निवडक १० देशांमध्ये एअर एशियाच्या विमानाने प्रवास करायचा असल्यास त्यावरही सूट मिळणार आहे. ऑकलंड, बाली, बँगकॉक, क्वालालंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनी या एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशात केवळ १ हजार ४९९ रुपयांच्या बेस फेअरमध्ये प्रवास करता येणार आहे.