महान लेखिका महाश्वेतादेवींना गुगलची मानवंदना


गुगल या सर्च इंजिनने डुडलद्वारे साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका म्हणजे महाश्वेतादेवींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. महाश्वेतादेवींचा १४ जानेवारी १९२६ रोजी जन्म आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव धरित्री देवी आणि वडिलांचे नाव मनिष घटक असे होते. हे दोघेही साहित्यिक होते. महाश्वेतादेवींना त्यांच्याकडूनच लेखनाचे धडे मिळले. त्यांचे कुटुंब भारताची फाळणी झाली तेव्हा पश्चिम बंगालमध्ये आले. विश्वभारती विद्यापीठ आणि शांतीनिकेतन मधून महाश्वेता देवी यांनी इंग्रजी विषय घेऊन बी.ए. केले. तर कोलकाता विद्यापीठातून एम. ए. केले. महाश्वेतादेवींनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून दीर्घकाळ काम केले.

त्यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांच्या लेखनाची सुरुवात त्यांनी काही लघूकथांद्वारे केली. महाश्वेता देवींच्या आयुष्यावर १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनाचा प्रभाव पडला. त्यानंतर १९४३ मध्ये दुष्काळ पडला. ज्या दरम्यान समाजसेवेचे व्रत महाश्वेतादेवींनी हाती घेतले ते अखेर पर्यंत सोडले नाही. त्यांचा विवाह १९४७ मध्ये प्रख्यात रंगकर्मी विजन भट्टाचार्य यांच्याशी झाला. १९५६ मध्ये महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. ‘झांसी की रानी’ असे या पुस्तकाचे नाव होते. रुदाली, हजार चौरासी की माँ, माटी माई या त्यांच्या पुस्तकांवर चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आली.

समाजातील शोषण आणि त्यावर होणारा विद्रोह यावर या पुस्तकातून महाश्वेतादेवी यांनी लिखाण केले. या पुस्तकात बिरसा मुंडा येथे ब्रिटिश काळात झालेल्या संघर्षाचे वर्णन होते. त्यांना १९७९ मध्ये या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Comment