जाहिराती कम, नातेवाईक जादा – फेसबुकचा नवा फंडा


फेसबुकवरून आपल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी संधी शोधणाऱ्या कंपन्यांसाठी वाईट बातमी. फेसबुकने आता जाहिरातींऐवजी लोकांना त्यांच्या मित्रमंडळीच्या व कुटुंबियांच्या पोस्टला जास्त दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.

खुद्ध फेसबुकचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याने यंदा फेसबुकमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांची खुली चर्चा केली आहे. या बदलांनुसार लोकांच्या मित्र किंवा कुटुंबियांनी शेअर केलेल्या सामग्रीला न्यूज फीडमध्ये अधिक प्राधान्य देणार आहे. तसेच एखाद्या ब्रँड किंवा अन्य पब्लिशर्सच्या सामग्रीला कमी महत्त्व देण्यात येणार आहे.

“आतापर्यंत लाईक्स किंवा कॉमेंट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना बांधून ठेवणाऱ्या साहित्याला फेसबुक महत्त्व देत होते. मात्र आता कंपनीने हे धोरण बदलण्याचे ठरविले आहे,” असे झुकेरबर्गने सांगितले.

मात्र फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींवर या बदलांचा कोणताही परिणाम होणार नाही, असे फेसबुकचे उपाध्यक्ष जॉन हेगमॅन यांनी स्पष्ट केले.

जगभरातील दोन अब्जपेक्षा जास्त लोक दर महिन्याला फेसबुकचा वापर करत असून हे जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क आहे.

Leave a Comment