हरिमन मोटर्सची इलेक्ट्रीक कार, १ किमीसाठी ५० पैसे खर्च


दिल्लीच्या स्टार्टअप हरिमन मोटर्सने नुकतीच दोन सीटर इलेक्ट्रीक कार तयार केली असून ती आता टेस्टींग मोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारची बॅटरी बदलण्याची आवश्यकता नाही तसेच एकदा चार्ज केली की ती २०० किमीचे अंतर पार करते. डीसी चार्जिंगवर ती १० मिनिटातच पूर्ण चार्ज होते तर एसी चार्जिंगवर त्यासाठी १ ते २ तास लागतात. या कंपनीने सोसायट्यांना चार्जिंग स्टेशन उभारावीत यासाठी निमंत्रित केले असल्याचेही समजते.

विशेष म्हणजे ही कार अतिशय किफायती आहे कारण ती ५० पैसे प्रतिकिलोमीटर अशा खर्चात चालते.शिवाय ज्यांचा क्रेडीट स्कोअर चांगला आहे त्यांना डिलरशीपवर जाऊन क्रेडीट कार्डच्या सहाय्याने फक्त ६०० रूपये भरून ती घरी नेता येणार आहे. त्यानंतर दररोज पैसे भरून उर्वरित रक्कम भागविता येणार आहे. ही कंपनी येत्या दोन वर्षात तीन नवीन प्रॉडक्ट बाजारात आणणार असून त्यात दोन सीटर कार, चार सीटर कार व ६ सीटर बसचा समावेश आहे. बसही ५० पैसे प्रतिकिलोमीटर या खर्चातच चालणार असून ती ई रिक्शा म्हंणूनही वापरता येणार आहे. या सर्व वाहनांत सेफ्टी, कंफर्ट, सुरक्षा यांची उत्तम व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment