म्हैस रंगवा, हजारो डॉलर्स चे बक्षीस मिळवा


खेळ, स्पर्धा यांचा सध्या जोरदार सीझन सुरू असतानाच चीन मध्ये परंपरेतून निर्माण झालेली एक स्पर्धा नुकतीच पार पडली. चीनच्या दक्षिण पश्चिम भागातील जिआंगचेंग येथे ही स्पर्धा गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर साजरी होत असून यंदा या स्पर्धेत तीन देशातील ३० टीम सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत म्हशींना आकर्षक रंगांनी रंगविण्याचे काम करायचे असते. यंदा ही स्पर्धा जिंकणार्‍या गटाला १५३०० डॉलर्सचे बक्षीस दिले गेले. या गटीने तीन देशांची राष्ट्रीय फुले म्हशीच्या अंगावर अतिशय आकर्षक पद्धतीने रंगविली होती.

असे सांगतात अनेक वर्षे येथे म्हशी रंगविण्याची परंपरा आहे. त्यामागचे कारण असे होते की या म्हशी जवळच्या जंगलातून चरायला गेल्या की त्यांच्यावर चित्ते हल्ले करून त्यांना ठार मारत. म्हशींचे वन्यप्राण्यांच्या हल्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्या विविध रंगांनी रंगविल्या जात असत. नंतर त्याचेच स्पर्धेमध्ये रूपांतर झाले. विजेते सांगतात म्हैस रंगविण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. स्पर्धा जोरदार असते व त्यामुळे सहभागी होणार्‍या टीम वर्षभर त्याचा सराव करत असतात.

Leave a Comment