बिटकॉईनप्रमाणेच जिओ कॉईन्स आणणार अंबानी


रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी लवकरच जगभर लोकप्रिय ठरलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या धर्तीवर जिओ कॉईन्स आणण्याच्या तयारीत असल्याचे बिझनेस न्यूजपेपर मिंट च्या रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे. या योजनेवर मुकेश यांचा मुलगा आकाश याच्या नेतृत्त्वाखाली ५० युवा सदस्यांची टीम काम करत असल्याचेही सांगितले जात आहे. ही टीम ब्लॅकचेन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.

विशेष म्हणजे जगभरात कांही महिन्यांच्या अवधीत रेकॉर्ड ब्रेक किंमत नोंदविणारे बिटकॉईन सध्या घसरणीला लागले असतानाच रिलायन्स कडून क्रिप्टेाकरन्सी सुरू केली जात असल्याची बातमी आली आहे. बिटकॉईनला सर्वाधिक मागणी असलेल्या दक्षिण कोरियाने बिटकॉईन एक्स्चेंजला टाळे ठेाकण्याची तयारी चालविली असून यामुळे बिटकॉईनच्या प्रतिकॉईन १७ हजार डॉलर्सवर गेलेल्या किंमती वेगाने घसरून १२८०० डॉलर्सवर आल्या आहेत.जगभरातील बहुतेक सर्व देशांचे सरकार लोकांचे आकर्षण बनत चाललेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे सावध झाली आहेत.

भारतात अर्थमंत्री अरूण जेटली व रिझर्व्ह बँकेनेही क्रिप्टेाकरन्सीमधील कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीला सरकार जबाबदार नसल्याचे व हे व्यवहार धोकादायक ठरू शकत असल्याचा इशारा यापूर्वीच वारंवार दिला आहे. तरीही ज्यांना या करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर करावी अशा सूचनांही जारी केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment