लास वेगास येथे सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो २०१८ मध्ये दररोज नवनवीन उपकरणे सादर होत असतानाच मेलोन विद्यापीठातील संशोधकांनी बनविलेला एक रंग म्हणजे पेंट ग्राहकांचे खास आकर्षण बनला आहे. हा पेंट ज्या पृष्ठभागावर लावला जाईल तो पृष्ठभाग टचस्क्रीनमध्ये परावर्तित करण्याची क्षमता या रंगात आहे. या गोष्टीवर कदाचित विश्वास बसणार नाही मात्र या रंगाची प्रात्यक्षिके येथे सादर केली जात आहेत व त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अनोखा रंग, कोणताही पृष्ठभाग बनेल टचस्क्रीन
संशोधकांनी या पेंटसाठी इलेक्ट्रीक फिल्ड टेमोग्राफी या तंत्राचा वापर केला आहे. यामध्ये छोटे इलेक्रोा ड एकत्र केले जातात. त्यामुळे प्लॅस्टीक, भिंती, अथवा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर हा पेंट मारला की त्याचे टचस्क्रीन मध्ये रूपांतर होते. त्यावर युजर बोटांच्या सहाय्याने टच करून त्याला हवी ती माहिती मिळवू शकतो. या वर्षअखेरही हे पेंट बाजारात येतील असे सांगितले जात आहे.