नितीश कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यावर ग्रामस्थांची दगडफेक


पाटणा – आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या समीक्षा यात्रेदरम्यान ही घटना बक्सार जिल्ह्यातील नंदार गावात घडली आहे. ही दगडफेक ग्रामस्थांनी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे अचानक केलेल्या दगडफेकीतून बचावले आहेत. पण यात काही सुरक्षा अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, काही गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्री भेट देणार होते, पण ग्रामस्थांनी सुरक्षा ताफ्यावर हल्ला केला.